व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १७ हप्ता केव्हा मिळणार? पहा सविस्तर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

शेतकरी वर्गासाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे. ज्या गोष्टीसाठी आपण आतुरतेने वाट पाहत असतात. ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १७ हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे, जी की शेतकरी वर्गासाठी खूपच फायदेशीर आहे. आतापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत १६ हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, व तो कधी जमा होणार आहे याबाबतची माहिती समोर आली आहे.

पी एम किसान च्या योजने मधून हे शेतकरी अपात्र झालेले आहेत. लिस्ट पाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वाटप

१८ फेब्रुवार २०२४ रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांनी २१,००० कोटीहून अधिक रुपयांचा हप्ता या योजनेअंतर्गत जाहीर केला होता. पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता सुमारे 9 कोटी पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यामध्येच या योजनेचा हप्ता जाहीर करून याच महिन्यामध्ये याचे वाटप देखील करण्यात आले होते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्या बद्दल थोडक्यात…

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा फेब्रुवारीमध्येच जाहीर झाला व त्याचे वाटपही फेब्रुवारीतच झाले. यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १७ वा हप्ता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच ४ जून नंतर कोणत्याही तारखेला पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

हे वाचा 👉  तीन पत्ती मास्टर ॲप डाऊनलोड| teen patti master app download 2025

पी एम किसान योजनेमध्ये घरातील सर्वांचे नाव कसे घालायचे याबाबत माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

पी एम किसान सन्मान योजने विषयी थोडक्यात…

पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर २ हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात. या पी एम किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थींना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे हे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर, डिसेंबर-मार्च या तीन टप्प्यांमध्ये हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात.

पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे हे डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जाऊन ई-केवायसी करू शकता. बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करता येते.

पी एम किसान सन्मान निधी योजना पोर्टल 👇👇👇https://pmkisan.gov.in

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page