आंध्र प्रदेशातील एक घटना सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ घडला. रस्त्यावर पेट्रोल सांडलेले होते, त्या व्यक्तीने धुम्रपान करताना बिडीची काडी रस्त्यावर फेकली, आणि त्याचा परिणाम म्हणून दुकानं आणि वाहनं क्षणात आगीत जाळून खाक झाली.
त्याचे झाले असे घडली की एका व्यक्तीने आपल्या दुचाकीसाठी पेट्रोल घेतलं होतं, मात्र त्याचा कंटेनर खराब असल्याने पेट्रोल रस्त्यावर गळत होत. या रस्त्यावर असलेल्या दुकानांजवळ दोन व्यक्ती उभे होते आणि त्यांचे सांडलेल्या पेट्रोलकडे लक्ष न देता गप्पा मारत होते. त्यातील एकाने बिडी पेटवून तिची काडी रस्त्यावर फेकली ज्यामुळे तिथे मोठी आग लागली. या आगीत आसपासची दुकानं आणि वाहनं जलून गेली.
पहा व्हिडिओ
A man lit a beedi on the petrol leaking from the can and set it on fire. Anantapur – in Kalyanadurgam A person was carrying petrol in a can and the can fell down… the petrol fell on the road. But a person who did not notice this touched the beedi and set it on fire on the road. pic.twitter.com/dPKqz5OB16
— Majid Khan (@builder_majid) August 21, 2024
सुदैवाने स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून आणखी नुकसान होण्यापासून रोखले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे धुम्रपान करताना किती काळजी घेणे आवश्यक आहे हे पुन्हा एकदा समजले आहे.
धुम्रपानाच्या या एका चुकीमुळे अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागले, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.
धुम्रपान करताना विशेषत: सार्वजनिक ठिकाणी काडी सिगारेटचे थोटूक इतरत्र फेकण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर या घटनेप्रमाणे जीवित आणि वित्तीय नुकसान होऊ शकते.