व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

12th Result 2024: १२ वीचा निकाल पाहा आणि मार्कशीट डाऊनलोड करा.

Maharashtra Board 12th Results 2024: १२ वीचा निकाल पाहण्यासाठी कोणते महत्वाचे तपशील आवश्यक असतात जाणून घेऊ…

MSBSHSE Class 12th Results 2024 Date Time Declared:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र शिक्षण मंडळामार्फत २ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते, याच परीक्षांचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या https://mahresult.nic.in/ अधिकृत वेबसाइट किंवा अन्य वेबसाइटवरून पाहू शकता. पण, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात, जे भरल्यानंतर निकाल पाहता येतो. हेच महत्त्वाचे तपशील नेमके कोणते आहेत, जाणून घेऊ…

या शिक्षण मंडळाचा निकाल 21 मे ला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला निकाल खाली दिलेल्या संकेतस्थळावर उद्या मंगळवारी 21 मे ला दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 

हे वाचा-  पासपोर्ट काढण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती पहा| how to get passport, step by step information.

बारावीचा निकाल कसा पाहायचा?

१२ वीचा निकाल पाहण्याचे तीन पर्याय

१) MSBSHSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये काही वेबसाइट्सचा उल्लेख केला आहे, ज्यावर HSC 2024 चा निकाल उपलब्ध असेल. विद्यार्थी या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

२) विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतील.

३) इयत्ता १२ वीचा निकाल डिजिलॉकरवरदेखील उपलब्ध असेल, जो विद्यार्थी ॲपमध्ये लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.

१२ वीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजिलॉकर आणि एसएमएस सेवेद्वारे पाहू शकतात. पण, तो तपासण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे १२ वीचे प्रवेशपत्र तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे .

इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहायचा असेल तर महाराष्ट्र HSC बोर्डचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागते, त्यानंतरच स्क्रीनवर तुम्हाला निकाल दिसेल.

काही वेबसाइट्सवर तुम्हाला रोल नंबरसह शाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतरच तुम्हाला निकाल पाहता येतो.

१) https://mahresult.nic.in/

२) http://hscresult.mkcl.org

३) http://www.mahahsscboard.in

४) https://results.digilocker.gov.in

५)http://results.targetpublications.org

१२ वीचा ऑनलाइन निकाल कसा पहाल?

  • १) https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • २) अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
  • ३) त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
  • ४) आता तुम्हाला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.
  • ५) त्यापुढे View Result वर क्लिक करा.
  • ६) निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल.
हे वाचा-  महाराष्ट्रात महिलांना दरमहा 1200 रुपये, लाडकी बहिण योजनेची सुरुवात होणार

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment