व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? याबाबतची अधिकृत घोषणा होणार राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये.! Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण केंद्र सरकारकडून केले गेले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु यावेळी फक्त पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार? याची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये नमो शेतकरी महासन्माननीती योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? हे पाहूया.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी थोडक्यात..

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे. नमो शेतकरी ही योजना राज्य सरकारची एक खूप महत्त्वाची आणि महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचा उद्देश राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 अनुदान दिले जाते. हे अनुदान 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

अर्थमंत्री नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याची बजेटमध्ये करू शकतात घोषणा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित केला. परंतु राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 वा हप्ता कधी मिळणार? याची आतुरता लागली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यापूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्रपणे वितरित केले होते. मात्र यावेळी हे दोन्ही हप्ते एकत्रित केले नाहीत. यामुळेच राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

हे वाचा 👉  PAN Card and Aadhaar Card Linking: घरबसल्या करा सोप्या स्टेप्सने आधार कार्ड ला करा पॅन कार्ड लिंक.

राज्याचे अर्थमंत्री श्री. अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी मांडणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेबाबतची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्री करू शकतात. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात, यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार? याबाबतची घोषणा अर्थमंत्री अर्थसंकल्पांमध्ये करण्याची दाट शक्यता आहे.

नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपये कधी मिळणार? पात्र शेतकऱ्यांना लागली उत्सुकता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी राज्य कृषी विभागाकडून करण्यात येते. नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते पात्र शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत. परंतु 6 व्या हप्त्याचे वितरण राज्य सरकारकडून कधी केले जाणार आहे? याबाबतची उत्सुकता सदर योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना लागली आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता व पीएम किसानचा 18 वा हप्ता एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता. परंतु पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आले, परंतु यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वितरण केले गेले नाही. त्यावेळी नमो शेतकरी चा हप्ता एक किंवा दोन मार्चपर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे काही होताना दिसली नाही, यामुळे पात्र शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे.

हे वाचा 👉  पंजाबराव डख यांचा अवकाळी पावसाचा हवामान अंदाज |पंजाब डख हवामान अंदाज.

10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री श्री.अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? याची घोषणा करू शकतात. त्यामुळे लवकरच नमो शेतकरी योजनेचा खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित होऊ शकतो.

या पोस्टमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कधी वितरित केला जाणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. अधिकृत माहितीच्या आधारे राज्याचे अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याच्या  अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या हप्त्याबाबत घोषणा करू शकतात, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा 6 वा हप्ता लवकरच मिळेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page