व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ICC Champion Trophy 2025: India Vs Bangladesh सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पहा मोबाईलवर, या ॲपवरून…

जर तुम्ही क्रिकेट शौकीन असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पोस्टमध्ये आपण आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या माहिती बरोबरच आज होणारा भारत विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कोणत्या ॲपवरून पाहायचा? हे पाहूया.

ICC Champion Trophy 2025 विषयी थोडक्यात..

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 क्रिकेट स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथमतः ही स्पर्धा फक्त पाकिस्तान मध्येच आयोजित केली होती परंतु भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील राजकीय तणावामुळे भारतीय संघाचे सर्वसामान्य दुबई येथे खेळवले जाणार आहेत. म्हणून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील एकूण 8 संघ सहभागी झालेले असून, या संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आलेले आहे. त्यापैकी..

आधार कार्ड वरून 50 हजार रुपये मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.👇

गट-अ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड तर गट-ब मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील सर्व सामाने हे साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असून, प्रत्येक गटातील टॉपचे 2 संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतील. त्यातून अंतिम दोन संघांमध्ये फायनलचा सामना होईल.

भारत विरुद्ध बांगलादेश पुन्हा एकदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये लढणार..

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच उत्कंठा आणि रोमांचक असतात. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2017 मध्ये हे संघ एकमेकाविरुद्ध उपांत्य सामन्यामध्ये लढले होते. त्यावेळी भारताने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला होता.

हे वाचा 👉  3KW चे सोलार सिस्टम बसवा, मोफत वापरा टीव्ही, फ्रीज, कुलर, एसी, फॅन. सोबतच मिळवा सूर्यघर योजनेअंतर्गत 78 हजार रुपये अनुदान

आता आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने हे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. यावेळी कोणता संघ वरचढ ठरेल हे 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यामध्येच कळू शकेल. भारतीय संघ हा त्यांच्या मजबूत फलंदाजी आणि फिरकीच्या जोरावर विजय मिळवू शकतो तर, बांगलादेश संघ त्यांच्या वेगवान गोलंदाजीच्या मदतीने या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

भारत विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कसा पाहायचा?

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना 20 फेब्रुवारीला दुबई येथे होणार आहे. भारतीय संघाचे सर्वसामान्य हे दुबईमध्येच खेळवले जाणार आहेत. याचे कारण आपण वर सांगितलेले आहेच. सदरच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतामध्ये जिओ स्टार नेटवर्कवर उपलब्ध असून यामध्ये भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या 9 विविध भाषांमधून समालोचन केले जाणार आहे.

आधार कार्ड वरून 50 हजार रुपये मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.👇

जर तुम्ही मोबाईल वरून हा सामना पाहणार असाल तर, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store वरून jioHotstar App डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=in.startv.hotstar

वरील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करून त्यामध्ये लॉग इन करून हा सामना मोबाईलवरून लाईव्ह पाहू शकता.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2:50 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीमची संभाव्य प्लेइंग इलेव्हन याप्रमाणे असू शकते..

हे वाचा 👉  CIBIL Score: खराब सिबिल स्कोअर असलेल्या लोकांना आता कर्जाशिवाय आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल(उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (क्रिकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

भारताचा खूपच महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही.

या पोस्टमध्ये आपण आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील भारतीय टीमचा पहिला सामना बांगलादेश बरोबर होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपण मोबाईलवर कोणत्या अँप वरून पहायचे? हे सांगितलेले आहे. जर तुम्ही या सामन्याचा आनंद मोबाईलवरून घेणार असाल तर, तुम्ही या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून या सामन्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page