नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ज्याचा वापर केला जातो तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम होय. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वरून जगभरातील अनेक लोक पैसे कमवत आहेत. म्हणूनच आपण या लेखांमध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पैसे कसे कमवायचे? (How to Earn Money From Instagram In Marathi) याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुद्धा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवू शकाल.
इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंट वरील फॉलोअर्सची संख्या जास्तीत जास्त वाढवणे गरजेचे आहे. तुमच्या अकाउंट मध्ये जितके सक्रिय फॉलोअर्स असतील तितके जास्त पैसे तुम्ही इंस्टाग्राम च्या माध्यमातून मिळवू शकता. जर कोण नवीन इंस्टाग्राम वापरकर्ता असेल आणि तो या प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवण्यासंदर्भात विचार करत असेल तर त्याच्यासाठी वर दिलेली माहिती खूपच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आम्ही काही इतर महत्त्वाची माहिती सुद्धा देणार आहे. जी माहिती तुम्हाला पैसे कमवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल.
ऑनलाइन अर्निंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇
Instagram विषयी थोडक्यात..
इंस्टाग्राम ॲप हे एक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की त्या द्वारे तुम्ही तुमच्या मोबाईल मार्फत फोटो, व्हिडिओ शेअर करू शकता. मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनी या ॲपची मालक आहे. केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रिगर यांनी ऑक्टोंबर 2010 रोजी याची निर्मिती केली होती. एप्रिल 2012 मध्ये या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या 10 कोटी होती. डिसेंबर 2014 मध्ये ही संख्या वाढून 30 कोटी झाली. हे ॲप अँड्रॉइड, आयफोन, आयपॅड, नोकिया या ऑपरेटिंग सिस्टिम वर चालते. याला एप्रिल 2012 मध्ये फेसबुक कंपनीने एक अब्ज अमेरिकन डॉलरला विकत घेतले होते. सध्या इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा जगभरामध्ये खूपच लोकप्रिय आहे. या ॲपचा वापर मनोरंजनासोबतच पैसे मिळवण्यासाठी देखील केला जात आहे.
Instagram Account काय आहे?
भारतामध्ये सध्या सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत इंस्टाग्राम पहिल्या नंबर वर आहे. इंस्टाग्राम मध्ये दर तिसऱ्या दिवशी नवीन खाते तयार केले जाते. इंस्टाग्राम अकाउंट मध्ये प्रत्येक वापरकर्त्याचे नाव वेगवेगळे असू शकते, ज्याला लोकांनी मान्यता सुद्धा देऊन ही लोक एकमेकांशी जोडलेले आहेत.
इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Instagram वर खाते तयार करणे आवश्यक आहे. सदर खाते तयार करताना खात्यावर स्वतःबद्दल आणि तुमच्या कामाबद्दलची योग्य माहिती भरा. त्यानंतर तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर तुमचे मित्र नातेवाईक आणि ओळखीचे लोक जोडून त्यावर पोस्ट करणे सुरू करा. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये एखादी चांगली पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ टाकत रहा. तुमच्या पोस्टला योग्य आणि अचूक हॅशटॅग वापरा, यामुळे तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढेल.
जस-जसे तुमच्या फॉलोवरची संख्या वाढत जाईल त्यावेळी तुम्हाला इंस्टाग्राम वरून पैसे कमवण्याचे 5 मुख्य मार्ग सापडतील. ते 5 मुख्य मार्ग कोणते आहेत हे आपण सविस्तरपणे खाली पाहूया:
Instagram वरून पैसे कमवण्याचे पाच मुख्य मार्ग
प्रायोजक पोस्ट
तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर प्रायोजक पोस्ट टाकून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या फॉलोवरची संख्या खूपच जास्त असेल तर वेगवेगळी उत्पादने आणि कंपन्या तुमच्याशी स्वतः संपर्क करून तुमच्या प्लॅटफॉर्म द्वारे त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करतील. तुम्ही फक्त प्रायोजक म्हणून तुमच्या खात्यावर ब्रॅण्डेड उत्पादन किंवा सेवांची पोस्ट करणे आवश्यक आहे. पण यासाठी तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर सक्रिय फॉलोअर्सची संख्या खूप जास्त असणे आवश्यक आहे.
उत्पादनांची विक्री करणे
जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम खात्याच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करू शकता. तुमचा व्यवसाय हा कोणतेही उत्पादन किंवा सेवा देणारा असेल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे स्वतःचे उत्पादन विकू शकता. जर तुमच्या खात्यावर खूप सक्रिय फॉलोअर्स असतील तर तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती त्यांना होईल आणि जर त्यांना तुमचे उत्पादन आवडले तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील. अशाप्रकारे देखील तुम्ही तुमचे स्वतःचे उत्पादन विकून इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकता.
फोटो विक्री
इंस्टाग्राम वर फोटोंची विक्री करूनही पैसे मिळतात. अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या फोटो विकून पैसे कमवत असतात. तुम्हीही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर किंवा अकाउंट वर काही खास फोटो पोस्ट करून नंतर त्यांची विक्री करून पैसे कमवू शकता. जर तुमचा फोटो खूप चांगला आणि अद्वितीय असेल तर तुम्ही तुमचा फोटो ब्रॅण्डेड कंपन्यांना विकून पैसे मिळवू शकता.
ऑनलाइन अर्निंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇
संलग्न विपणन (Affiliate marketing)
इंस्टाग्राम वरून एफिलीएट मार्केटिंग करून सुद्धा पैसे कमवता येतात. एफिलीएट मार्केटिंग हे एखाद्या प्रायोजकाच्या जाहिराती सारखे असते. यासाठी तुम्हाला एखाद्या कंपनीच्या संलग्न कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागते. कंपनीच्या संलग्न कार्यक्रमांमध्ये सामील झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर कंपनीची उत्पादने शेअर करून पैसे मिळवता येतात. तुम्ही सदर कंपनीची उत्पादने तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केल्यानंतर एखाद्या वापरकर्त्यांने तुमच्या खात्याद्वारे त्या कंपनीचे उत्पादन खरेदी केली तर तुम्हाला सदर उत्पादनाचे काही कमिशन देखील मिळते.
सेवेचा प्रचार करणे
जर तुम्ही यूट्यूब चॅनेल चालवत असाल किंवा टिकटॉक, हेलो किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ किंवा कोणतीही इतर सामग्री टाकल्यास तुम्ही ती इंस्टाग्रामवरून शेअर करून प्रचार करू शकता. सदरची सामग्री इंस्टाग्राम वर पोस्ट केल्याने ती तुमच्या सर्व सक्रिय फॉलोअर्सकडे जाईल, ज्या द्वारे तुमच्या दोन्ही अकाउंटचा प्रचार होईल आणि तुम्ही पैसे कमवू शकाल.
ब्रँडचा प्रचार करणे
तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलोअर्सची संख्या खूपच जास्त झाली असेल तर, तुम्ही मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करून पैसे कमवू शकता. इंस्टाग्राम पेजवर कपडे, शूज, कॅफे, टी-शर्ट, घड्याळे यासारख्या ब्रँडची जाहिरात करून तुम्ही भरपूर पैसे इंस्टाग्राम वरून कमवू शकता. जर तुमचा फॉलोअर्स फॅशन किंवा चांगल्या ब्रँडचा शौकीन असेल तर तुम्हाला दर्जेदार आणि मौल्यवान कंपनी ब्रँडचा प्रचार करणे खूपच गरजेचे आहे.
सदर लेखामध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवू शकतो?(How to Earn Money From Instagram in Marathi) याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकता.