व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ऑनलाइन पैसे कमवा – घरबसल्या दररोज ₹1000! Best Online Earning Websites

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आजच्या या डिजिटल युगामध्ये नवनवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्याने घरबसल्या पैसे कमवण्याच्या खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये Best Online Earning Websites कोणत्या आहेत? याबरोबरच या वेबसाईटच्या साह्याने ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.

जर तुम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा जॉब करणारे असाल तर तुम्ही तुमच्या या कामातून थोडा वेळ काढून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार करू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे काही कौशल्य असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे कौशल्य असतील तर तुम्ही पूर्ण वेळ काम करून एक शाश्वत इन्कम सोर्स तयार करून चांगली कमाई करू शकता. तर मग पाहूया अशा कोणत्या वेबसाईट आहेत ज्यांच्या मार्फत आपण एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार करू शकतो.

Best Online Earning Websites

पण आता अशा कोणत्या Best Online Earning Websites आहेत ते पाहूया, त्याचबरोबर सदरच्या वेबसाईटचा वापर कशा पद्धतीने करून पैसे कमवायचे हे देखील सविस्तर पाहूया:

1. लेखन आणि कंटेंट रायटिंग करून पैसे कमवा

जर तुमचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर, बरोबर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमच्याकडे इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा शब्दसंग्रह असेल तर, कंटेंट रायटिंग हा एक पैसे कमावण्याचा उत्तम पर्याय आहे. विविध वेबसाइट्स आणि कंपन्यांना ब्लॉग, लेख, उत्पादनांचे वर्णन आणि वेब कन्टेन्ट लागतो. लेखन आणि कंटेंट रायटिंग करून तुम्ही एक चांगला साईड इन्कम सोर्स तयार करू शकता. यासाठी तुम्ही खालील वेबसाईटचा वापर करू शकता.

  • Textbroker या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या लेखनाचे प्रोजेक्ट सहजपणे मिळू शकतात.
हे वाचा 👉  Ration card ekyc| घरबसल्या सोप्या पद्धतीने करा ई-केवायसी, पहा संपूर्ण माहिती.

2. कॉलेज असाइनमेंट पूर्ण करून पैसे कमवा

जर तुम्ही कॉलेजचे स्टुडन्ट असाल तर, तुम्हाला असाइनमेंट पूर्ण करणे सक्तीचे असते. काही विद्यार्थी या असाइनमेंट पूर्ण करणे टाळतात. काही विद्यार्थ्यांकडे वेळ कमी असल्यामुळे ते विद्यार्थी या असाइनमेंट पूर्ण करू शकत नाहीत. यामध्ये वरील दोन्ही प्रकारच्या  विद्यार्थ्यांना या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज असते. या संधीचा फायदा घेऊन काही वेबसाईटवरून तुम्ही या विद्यार्थ्यांचे असाइनमेंट पूर्ण करून पैसे कमवू शकता. विशेषतः जर तुम्हाला संशोधन किंवा रिसर्च करायला आवडत असेल तर हे काम तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. खालील वेबसाईट वरून तुम्हाला विविध विषयांच्या असाइनमेंट अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतात. त्या वेबसाईट कोणत्या आहेत हे आपण खाली पाहूया.

  • Tutor Bin या वेबसाईटवरून विविध विषयांच्या असाइनमेंट पूर्ण करून चांगली कमाई करता येते.
  • Global Assignment Help – या वेबसाईटवरून विद्यार्थी आणि प्रोफेशनल्स यांच्यासाठी असाइनमेंट लिहून देता येतात.
  • Nerdy Turtlez – फ्रिलान्स असाइनमेंट रायटिंगसाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

3. शैक्षणिक मदत करून पैसे कमवा (Homework Sloving & Tutoring)

जर तुम्ही एका किंवा अनेक विषयांमध्ये मास्टर असाल तर तुम्ही इतरांना हे विषय चांगल्या प्रकारे शिकवू शकत असाल तर, शिक्षणाशी संबंधित ऑनलाईन जॉब्स तुमच्यासाठी पैसे कमवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या विषयासंबंधीत शंका किंवा प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्यांना या विषयासंबंधित योग्य ती उत्तरे देऊन पैसे कमवू शकता. शैक्षणिक मदत करून पैसे कमवण्यासाठीच्या वेबसाईट आपण खाली पाहूया.

  • Chegg – या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून पैसे कमवता येतात.
  • Presto experts – या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अनेक विषयांचे तज्ञ सल्लागार म्हणून काम करू शकता.
  • Course Hero या प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून पैसे कमवता येतात.
हे वाचा 👉  मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 |मिनी ट्रॅक्टर साठी सरकारकडून 90 टक्के अनुदान.

4. लो-कन्टेन्ट बुक डिझाईन करून पैसे कमवा

ज्यांच्या डोक्यामध्ये अनेक नवनवीन भन्नाट कल्पना तयार होतात त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला पैसे कमवण्याचा पर्याय आहे. आज-काल ऑनलाइन जर्नल, प्लॅनर्स, नोटबुक्स, पासवर्ड कीपिंग बुक्स यांना मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. तुम्ही जर तुमच्या नवनवीन कल्पनांच्या आधारे अशा प्रकारचे डिझाईन करून Amazon KDP वर अपलोड केले तर, तुम्हाला यातून भरपूर पैसे मिळवता येतात. यासाठीचा प्लॅटफॉर्म आपण खाली पाहूया.

  • Amazon KDP – स्व-प्रकाशासाठी एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे.

5. यूजर टेस्टिंग -ॲप आणि वेबसाईट चेक करून पैसे कमवा

जर तुमच्याकडे ऑब्झर्वेशन स्किल चांगले असेल आणि तुम्हाला बारीक सारी गोष्टी सहजपणे लक्षात येत असतील तर युजर टेस्टिंग तुमच्यासाठी योग्य असा पर्याय आहे पैसे मिळवण्यासाठी. अनेक कंपन्या त्यांचे नवनवीन ॲप्स, वेबसाइट्स आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी लोकांना पैसे देतात. तुम्हाला फक्त हे प्रॉडक्ट वापरून त्यातील त्रुटी शोधायच्या आणि फीडबॅक द्यायचा असतो. यातून तुम्हाला पैसे कमवता येतात. त्यासाठीच्या वेबसाईट खाली पाहूया.

  • User Brain
  • User Testing
  • Trymata
  • Userlytics

ऑनलाइन पैसे कमवण्याचे इतर पर्याय

वरील वेबसाईट व्यतिरिक्त अजून काही असे पर्याय आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता. हे पर्याय कोणते आहेत ते आपण खाली पाहूया:

1. डेटा एन्ट्री आणि टायपिंग

जर तुम्ही टायपिंग चांगल्या पद्धतीने करत असाल तर, तुम्हाला डेटा एन्ट्री आणि ट्रान्सस्क्रीप्शनमध्ये जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी खालील वेबसाईटच्या साह्याने तुम्ही डेटा एन्ट्री आणि ट्रान्सस्क्रीप्शन योग्य पद्धतीने करू शकता.

  • Upwork
  • Fiverr
  • Rev.com
हे वाचा 👉  फक्त पॅन कार्ड असलेल्यांना मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज, – Pan Card Low CIBIL instant Personal Loan app

2. Affiliate Marketing (अॅफिलीएट मार्केटिंग)

तुमच्या सोशल मीडिया अकाउंट किंवा ब्लॉक द्वारे एखाद्या प्रॉडक्टचे प्रमोशन करून कमिशनद्वारे पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.

  • Amazon Affiliate
  • ClickBank

या पोस्टमध्ये आपण दिलेली सर्व माहितीही ऑनलाइन पैसे मिळवण्यासाठीची आहे. वरील दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका किंवा सर्व पर्यायांचे तुमच्याकडे ज्ञान आणि कौशल्य असेल तर  तुम्ही पार्ट टाइम किंवा पूर्ण वेळ ऑनलाइन काम करून पैसे मिळवू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page