नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शुभेच्छा संदेश किंवा मेसेज, सुविचार संदेश किंवा मेसेज पाठवणे चांगले वाटते. परंतु हे शुभेच्छा संदेश, सुविचार संदेश किंवा मेसेज एक आकर्षक स्वरूपात तयार करून पाठवला तर, तुम्ही तुमचा प्रभाव नातेवाईक व मित्र परिवारामध्ये पाडू शकाल.म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये स्वतःच्या फोटोचा वापर करून दररोज नवीन सुविचार घालून संदेश किंवा मेसेज कसा बनवायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
स्वतःचा फोटो वापरून दररोज नवीन सुविचार घालून फोटो कसा बनवायचा?
स्वतःचा फोटो आपण दररोज नवनवीन सुविचार घालून फोटो कसा बनवायचा? याबाबतची सर्व स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
योग्य फोटोची निवड करणे
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगतानी स्पष्टता असलेला फोटो निवडावा लागेल. फोटो निवडताना त्या फोटोची रंगसंगती आणि पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. फोटो हा साधा आणि स्वच्छ पार्श्वभूमी असलेला निवडल्यास सुविचार अधिक स्पष्ट दिसेल.
योग्य सुविचारची निवड करणे
सुविचार हे योग्य आणि प्रेरणादायी निवडावेत, जेणेकरून हे सुविचार ज्यांना तुम्ही संदेश स्वरूपात पाठवत असता त्यांच्यावर प्रभाव टाकणारे असावेत. सुविचारामध्ये आयुष्याचे तत्वज्ञान, महापुरुषांचे विचार यांचा समावेश असावा. सुविचार हे लहान, प्रभावी आणि लक्षवेधी असावेत
फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करणे
तुम्ही तुमचा जो फोटो सुविचार फोटो तयार करण्यासाठी वापरणार आहात तो फोटो आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी एडिट करणे गरजेचे आहे. फोटो एडिट करण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर केला जातो. ही फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्याही ते खाली पाहू:
1. फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर
- फोटो एडिटिंग करण्यासाठी तुम्ही या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. त्यामध्ये Adobe, Photoshop, GIMP यासारख्या अनेक कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा समावेश होतो. हे कम्प्युटर सॉफ्टवेअर तुम्ही फोटो एडिटिंग करण्यासाठी वापरू शकता.
2. फोटो एडिटिंग मोबाईल ॲप्लिकेशन
- फोटो एडिटिंग करण्यासाठी तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनचा सुद्धा वापर करू शकता. त्यामध्ये Canva, PicsArt, Snapseed या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर फोटो एडिटिंग करण्यासाठी केला जातो.
स्वतःचा फोटो वापरून सुविचार फोटो तयार करण्यासाठी डिझाईन तयार करणे
1. डिझाईन तयार करताना सर्वप्रथम फोटोला योग्य आकार देऊन क्रॉप करून योग्य फ्रेमिंग करून घ्या. फोटोचा मुख्य भाग सुविचारासाठी जागा ठेवून क्रॉप करा.
2. फ्रेम वर हलके रंग किंवा ब्लर इफेक्ट लावा, जेणेकरून सुविचार उठून दिसेल. फ्रेम वरील रंगसंगतीमध्ये विरोधाभास ठेवा. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर,गडद रंगातील फ्रेम वर पांढऱ्या रंगातील टेक्स्ट चांगले दिसते.
3. सुविचाराचा टेक्स्ट ॲड करण्यासाठी निवडलेला सुविचार साठी चांगल्या प्रकारची फॉन्ट निवडा. टेक्स्ट फ्रेमवर घेतल्यानंतर त्या टेक्स्टचा रंग आकाराने जागा अचूक निवडा. सुविचार स्पष्ट दिसण्यासाठी त्या भोवती हायलाइट जोडा.
4. फोटो आकर्षक दिसण्यासाठी त्यामध्ये लहान आयकॉन, रेषा किंवा डिझाईन घटकांचा अतिरिक्त वापर करा. त्याचबरोबर अतिरिक्त घटकांमध्ये सुविचारांसोबतच तुमचे नाव, तारीख किंवा हस्ताक्षर जोडल्यास फोटो अधिक आकर्षक दिसेल.
स्वतःच्या फोटोसह सुविचार फोटो सेव्ह करून शेअर करा
स्वतःच्या फोटोसह तयार केलेला सुविचार फोटो हाय-क्वालिटीमध्ये सेव्ह करा. सेव्ह केलेला फोटो तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमच्या नातेवाईकांना त्याचबरोबर मित्रांना शेअर करून तुमचा प्रभाव पाडू शकता. त्याचबरोबर हे फोटो मोटिवेशनल पोस्टर म्हणून व वैयक्तिक ब्रॅण्डिंग साठी वापरू शकता.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
स्वतःच्या फोटोचा वापर करून सुविचार फोटो बनवण्याचे सॉफ्टवेअर आणि ॲप्स
सुविचार फोटो बनवण्याचे मोबाईल ॲप्लिकेशन
- Canva
- PicsArt
- Snapseed
- Phonto
- Pixlr
वरील मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तुम्ही तुमचा फोटो वापरून सुविचार फोटो अधिक आकर्षक बनवू शकता.
सुविचार फोटो बनवण्याचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
- Adobe Photoshop
- GIMP
- Fotor
सुविचार फोटो बनवण्याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म
- Canva (Web)
- Crello
वरील ॲप्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही स्वतःच्या फोटोवर सुविचार फोटो सहजपणे व आकर्षक तयार करू शकता.
सदर लेखांमध्ये आपण स्वतःचा फोटो वापरून सुविचार फोटो कसा तयार करायचा? त्याचबरोबर सुविचार फोटो तयार करण्यासाठी कोणकोणत्या एप्लीकेशन व सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्या एप्लीकेशन व सॉफ्टवेअरची यादी दिली आहे. यावरून तुम्ही तुमचा फोटो वापरून सुविचार फोटो आकर्षक आणि सहजपणे तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. धन्यवाद!