नमस्कार मित्रांनो, सध्याची तरुणाई सरकारी नोकरीच्या शोधात दिसत आहे. अशा तरुणाईसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. ही सुवर्णसंधी भारतीय टपाल खात्यामध्ये असणार आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सदर लेखाच्या माध्यमातून आपण या भरती विषयीची सर्व माहिती पाहूया.
ग्रामीण डाक सेवक (GDS) एकूण पदे
भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक या पदासाठी एकूण 25,200 पदे भरली जाणार आहेत असे जाहीर केले आहे. परंतु, या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे सदर भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, कारण या पदासाठी उमेदवारांची निवड ही गुणवत्ता किंवा मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे. यामुळे ज्या उमेदवाराचे मार्क्स चांगले आहेत त्या उमेदवारांना एक सुवर्णसंधी आहे.
पोस्टामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान उत्तीर्ण गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठीची वयोमर्यादा
ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती(SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षाची वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाणार आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची मुदत
ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीसाठी उमेदवार 3 मार्च 2025 पासून 28 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतो. सदर पदासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://indiapostgdsonline.gov.in
सदर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्येच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
ग्रामीण डाक सेवक पदाचे अर्ज शुल्क
ग्रामीण डाक सेवक पदासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यातील सामान्य म्हणजेच ओपन कॅटेगरी, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. मात्र अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), महिला आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
पोस्टामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
ग्रामीण डाक सेवक पदासाठीचे वेतन
ग्रामीण डाक सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त अतिरिक्त भत्ते सुद्धा उमेदवारांना मिळतील.
ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीबाबतचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे.
अंगणवाडी मध्ये 40 हजार पदांची भरती होत आहे. अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज कसा करायचा?
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर https://indiapost.gov.in किंवा GDS पोर्टल https://indiapostgdsonline.gov.in वर जावे लागेल.
- त्यानंतर तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
- त्यानंतर अचूक तपशिलासह अर्ज भरा.
- सदर पदासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की तुमचा फोटो आणि स्वाक्षरी.
- त्यानंतर सर्वात शेवटी अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करा आणि सदर अर्जाची एक प्रिंट काढून ती भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
या लेखामध्ये आपण भारतीय पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदासाठी जी भरती केली जाणार आहे त्या भरतीची अधिसूचना म्हणजेच सदर भरतीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. धन्यवाद!