Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. जर योजनेचे पैसे तुम्हाला आले नाही तर ‘या’ नंबरवर कॉल करा.
‘माझी लाडकी बहीण योजना’ 2024 मध्ये सुरू करण्यात आली. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 डिसेंबरनंतर सहावा हप्ता जमा झालेला आहे. कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात यासंबंधित निर्णय झालेला आहे.लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीतही भरू शकता.
पैसे जमा न झाल्याची कारणे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेचा फॉर्म भरलेल्या महिलांचं बँक अकाऊंट आधार नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर पैसे खात्यात येण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी महिलांना आधी आपलं बँक अकाऊंट आधारशी लिंक करावं. जेणेकरुन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.
तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरलेले आहेत व आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहिणीचे एकही हप्ता आलेला नाही याबद्दलची ही काही कारणे आहेत:
- लाडकी बहीण योजनेच्या अर्जात तुम्ही भरतांनी तुम्ही चुकीची कागदपत्रे अपलोड केली आहेत व तुमच्या अर्ज रीसबमिट साठी परत आलेला आहे.
- त्यानंतर तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करून पाठवला आहे तो अर्ज आता पेंडिंग मध्ये आहे व तो मंजूर झालेला नाही.
- तुम्ही नारीशक्ती दूत ऐप किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाचे स्टेटस मंजूर असावे.
- तुमचे आधार कार्ड डीबीटी लिंकचे स्टेटस आतापर्यंत ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळणार नाही.
- तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करताना वेगळ्या पासबुक दिली असेल व तुमच्या आधार कार्ड ला दुसरे पासबुक लिंक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण मिळण्याच्या हप्ता येण्यास विलंब होईल.
लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास काय करावे?
- लाडकी बहीणीने स्वतःचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही , ते पाहावे.
- नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
- आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.
- ऑनलाइन बँकींगच्या मदतीने खात्यात पैसे आले का, हे चेक करा.
- जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर शेवटी 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करा.
181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर ‘लाडकी बहीण योजने’चा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करा. मिळालेल्या माहितीनुसार पुढे अपडेट व्हा. जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहीणींच्या बँकेत हप्ता जमा झाला. मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवा