व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

महिलांना मिळणार 90% टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर चा लाभ | Mini Tractor Yojana

Mini Tractor Anudan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन योजनेमध्ये. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आजकाल ट्रॅक्टरने शेतामधली किती लवकरात लवकर फटाफट काम होतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना बैलाने शेती करणे परवडत नाहीये. आज प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यासाठी उत्सुक आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढे महागडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे सरकारने ट्रॅक्टर वरती अनुदान योजना राबवली आहे. जर शेतकऱ्यांनो तुम्हाला मोठा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्हाला खूप कमी अनुदान सरकारद्वारे मिळतात. पण शेतकऱ्यांना तुम्हाला जर छोटे ट्रॅक्टर घ्यायचा असेल जसे की 9HP ते 18HP पर्यंत, तर तुम्हाला या ट्रॅक्टर वरती 90% सबसिडी सरकार देत आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन किती लाख रुपयाचे अनुदान देत आहे. हे सर्व काही आपण या लेखांमध्ये बोलणार आहोत.

देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, त्यातीलच एक योजना म्हणजेच मिनी ट्रॅक्टर योजना होय, महिलांना मिनी ट्रॅक्टर साठी 90 टक्के एवढे अनुदान दिले जाते व लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे.

हे वाचा-  मंदिरातील दानपेटी वरील QR कोड काढून स्वतःचा चिटकवला | चोराच्या खात्यात जमा झाले तब्बल इतके रुपये.

मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत महिलांना 90 टक्के अनुदान दिले जाईल परंतु उर्वरित असलेले दहा टक्के अनुदानाची रक्कम महिलेला भरावी लागणार आहे, 3 लाख 15 हजार रुपये पर्यंतची मदत दिली जाणार उर्वरित 35 हजार रुपये महिलेला भरावे लागेल.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राज्यातील सर्व काही अनुसूचित व मागासवर्गीय जाती जमातींसाठी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. हा मिनी ट्रॅक्टर त्याच लाभार्थ्यांना दिला जाईल जे नवबौद्ध व अनुसूचित जाती अथवा मागासवर्गीय जातीमध्ये मोडल्या जातात. या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर 90% सबसिडीवर दिला जाईल. त्याचप्रमाणे शेतकरी महिला बचत गटांना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर वरती सरकार द्वारे 90% सबसिडी देण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांनी फक्त 10 टक्के रक्कम स्वतःच्या खिशामधून गुंतवायची आहे. पात्र उमेदवारांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचे उपसाधन खरेदी करता 3 लाख 15 हजार रुपयांच अनुदान देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 18HP पर्यंत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर दिल्या जाते.

या महिलांना मिळणार मिनी ट्रॅक्टर

मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिलांना लाभ दिला जाणार आहे, महिला बचत गटाशी संबंधित असावी बचत गटातील सदस्य 80% अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावे, तसेच अध्यक्ष व सचिव सुद्धा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीलच असायला हवे.

हे वाचा-  Pm free electricity scheme|पीएम सूर्यघर योजना संपूर्ण माहिती.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायचे असेल तर दिलेल्या ऑप्शन पैकी योग्य पर्याय निवडून अर्ज भरावा लागणार आहे त्यामध्ये विचारली गेलेली संपूर्ण माहिती तुमचे नाव, गाव अशा प्रकारची माहिती योग्य प्रकारे भरावी व आवश्यक काही कागदपत्रे अपलोड करावी तसेच अर्ज सबमिट करावा अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दिवसात लॉटरी काढली जाईल त्यामधे तुमचे नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार.

अर्ज करण्याची वेबसाईट – https://mini.mahasamajkalyan.in

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment