व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला की नाही, असा चेक करा Installment Status…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी योजनाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा आर्थिक आधार म्हणून ओळखली जाते. परंतु सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? याची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदर योजनेचा 6 वा हप्ता 1 एप्रिल 2025 पर्यंत राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे असे जाहीर केले आहे. म्हणूनच सदर पोस्टमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे कसे चेक (Installment Status) करायचे? हे पाहूया.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल थोडक्यात…

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 रुपयांची रक्कम समान 3 हप्त्यांमध्ये दर 4 महिन्यांच्या अंतराने ₹2000 बँक खात्यामध्ये जमा केले जातात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आर्थिक आधार असलेली योजना आहे.

आत्तापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 हप्त्यांचे वाटप राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. या योजनेचा 5 वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024 रोजी वितरित करण्यात आला होता.

हे वाचा 👉  Phone Pe द्वारे 5 मिनिटात 50,000 रुपये वैयक्तिक कर्ज

नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता होणार या तारखेला वितरित

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता 1 एप्रिल  2025 पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे, असे राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले आहे. कृषिमंत्र्यांच्या या घोषणेमुळे नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या त्याबाबतच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा हप्ता जमा झाला आहे की नाही यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्याची स्थिती तपासून घेणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे Installment Status असे चेक करा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे चेक करायचे असेल तर, या स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्ही Installment Status चेक करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.👇🏼https://nsmny.mahait.org/
  • नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ‘नमो शेतकरी निधी स्टेटस’ हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 वा हप्ता जमा झाला आहे की नाही, याची स्थिती तुम्हाला समजते.

नमो शेतकरी योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट्स

नमो शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र नसल्यास नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो.

हे वाचा 👉  पी एम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याची तारीख ठरली, या तारखेला जमा होणार 4000 रुपये | pm kisan yojana 17 th installment

जर तुम्ही अद्याप तुमचा फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र बनवले नसेल तर, ते लवकरात लवकर बनवून घेणे अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही.

नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा?

जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज किंवा नोंदणी करणारा असाल तर, नवीन नोंदणी अजूनही सुरू आहे, पात्र शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी लवकरात लवकर अर्ज करा. सदर योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • नमो शेतकरी योजनेसाठी नवीन नोंदणी करायची असेल तर, तुम्हाला सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://nsmny.mahait.org/
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही नमो शेतकरी निधी योजना अर्ज करा यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि तुमच्या शेतजमिनीची कागदपत्रे अपलोड करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट करून स्टेटस तपासा.

अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी करू शकता. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर, तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र आहात. याचे कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा महासन्माननिधी योजनेसाठी राज्य सरकारकडून वापरण्यात आला आहे.

हे वाचा 👉  रेशन कार्ड घरबसल्या मिळवा: रेशन कार्ड मध्ये बदल करा, सर्व माहिती एका ॲपवर | Mera Ration 2.0 app download

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6 व्या हप्त्याचे Installment Status चेक कसे करायचे? त्याचबरोबर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेबाबत राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट्स सुद्धा आपण या पोस्टमध्ये पाहिले आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता जमा झाला आहे की नाही हे चेक करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page