व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,भारतीय डाक विभागामध्ये तब्बल 21,413 पदांसाठी होणार भरती.. जाणून घ्या पात्रता, वेतन, अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

सध्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना एका मागून एक सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून येत आहेत. यापूर्वी रेल्वे विभागामध्ये गट-ड पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता भारतीय डाक विभागांमार्फत तब्बल 21,413 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपण या लेखाच्या माध्यमातून या भरतीविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.

डाक विभाग- भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव

डाक विभागांमध्ये भरती करण्यात येणाऱ्या पदांची नावे आपण खाली पाहूया:

  • GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  • डाक सेवक

शैक्षणिक पात्रता

डाक विभाग भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा..

  • 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

डाक विभाग भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 3 मार्च 2025 रोजी..

  • 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • वर दिलेल्या वयांमध्ये SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत असेल, तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत असेल.

वेतन

डाक विभागामध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना मिळणारे वेतन..

  • GDS- ब्रांच पोस्ट मास्टर – ₹12,000/- ते ₹29,380/-
  • GDS- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर – ₹10,000/- ते ₹24470/-
  • डाक सेवक- ₹10,000/- ते ₹24470/-

परीक्षा फी

डाक विभाग भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्याकडून आकारण्यात येणारी परीक्षा फी..

  • जनरल/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला: यांच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.
हे वाचा 👉  पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम: सहा वर्षांत पैसे दुप्पट

डाक विभाग भरती प्रक्रियेची इतर महत्त्वाची माहिती

  • नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 3 मार्च 2025
  • अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख- 6 ते 8 मार्च 2025
  • अधिकृत संकेतस्थळ- https://www.indiapost.gov.in
  • भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा- https://drive.google.com/file/d/1ovpFimaFa8fWEqY0Kws5ulZeoMz0NJvo/view?pli=1
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- https://indiapostgdsonline.gov.in/

निवड प्रक्रिया

डाक विभाग भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे हे आपण खाली पाहूया:

  • अर्जदारांना सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्टच्या आधारे नियुक्तीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • मान्यताप्राप्त बोर्डाच्या दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे/ग्रेड्स/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर (खाली स्पष्ट केल्याप्रमाणे) आणि एकूण टक्केवारी 4 दशांश अचूकतेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • च्या अर्जदारांना दहावीच्या माध्यमिक शालेय परीक्षेच्या गुणपत्रिकेत प्रत्येक विषयात नमूद केलेले ‘गुण’ आणि ‘ग्रेड/गुण’ दोन्ही असतील त्यांच्या ‘गुणांची’ गणना “मिळवलेले गुण” विचारात घेऊन केली जाईल.
  • जर कोणताही अर्जदार गुणां ऐवजी ग्रेड/गुणांसह अर्ज करत असेल, तर त्याचा/तिचा अर्ज रद्द करण्यास पात्र असेल.
  • तथापि, जर कोणत्याही विशिष्ट विषयासाठी गुणपत्रिकेत फक्त ग्रेड नमूद केले असतील तर त्या विषयासाठी ग्रेड नमूद करता येतील आणि उमेदवारांनी ते गुणांमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता नाही.

या लेखामध्ये आपण डाक विभागामध्ये तब्बल 21,413 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, वरील माहितीच्या आधारे डाक विभागांमध्ये नोकरीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळू शकता. धन्यवाद!

हे वाचा 👉  मतदार यादीत नाव शोधणे| मतदार यादी डाउनलोड 2024 | मतदान कार्ड डाउनलोड करा व नवीन काढा. |Voting card download,list.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page