व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मतदार ओळखपत्र(voter ID) आधार कार्डशी(Aadhar Card) लिंक कसे करायचे? पहा संपूर्ण माहिती.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

या पोस्टमध्ये आपण मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या लोकशाही देशांमध्ये निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक असणे खूप गरजेचे आहे. यासाठी भारतीय निवडणूक आयोग सतत काही न काही नवनवीन उपायोजना करत असतो. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे हा एक निवडणूक आयोगाचा निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय आहे.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे का आवश्यक आहे?

निवडणूक आयोगाच्या एका अहवालानुसार असे दिसून आले आहे की, देशातील काही लोकांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र आहेत. काही ठिकाणी तर एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या नावाने मतदार कार्ड असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळेच बनावट किंवा डुप्लिकेट मतदार शोधण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्यासाठी खाली क्लिक करा.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्याचे फायदे

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्याचे फायदे आपण खाली पाहूया:

  • मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे डुप्लिकेट मतदार ओळखपत्र काढून टाकता येतील.
  • मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.
  • फक्त मतदान करण्यास पात्र नागरिकांनाच मतदानाचा हक्क मिळेल.
  • फसवणुकीला काळा बसून लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होईल.
हे वाचा 👉  शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलण्यात येणार, आता कर्नाटकातील संकेश्वरमधून जाणार नवीन महामार्ग

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे का?

सध्या तरी, मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य किंवा बंधनकारक नाही म्हणजेच ऐच्छिक आहे. लोक प्रतिनिधित्व कायदा,1950 च्या कलम 23(4),23(5) आणि 23(6) नुसार मतदाराला आधार क्रमांक जोडणे बंधनकारक नाही. जर कोणी आधार क्रमांक दिला नाही म्हणून सदर मतदाराचे नाव मतदार यादीतून काढले जाऊ शकत नाही.

सध्या मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे ऐच्छिक असले तरी, भविष्यात मतदार ओळखपत्र आधार कार्ड ची लिंक करणे अनिवार्य किंवा बंधनकारक होऊ शकते.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक कसे करायचे?

जर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करायचे असेल तर, खाली दिलेल्या पद्धती वापरून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ऑनलाइन प्रक्रिया (राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल द्वारे)

  • मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://voters.eci.gov.in/
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचे नवीन खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
  • “मतदार यादीत तुमचे नाव शोधा” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा EPIC क्रमांक (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाका.
  • “आधार क्रमांक फीड करा” हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची लिंकिंग विनंती सबमिट होऊन, काही वेळानंतर आधार कार्ड तुमच्या मतदार ओळखपत्रशी लिंक होईल.
हे वाचा 👉  Groww ॲप डाऊनलोड करून trading account काढा. व शेअर्स, ETF व म्युच्युअल फंडामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय करा गुंतवणूक.

ऑफलाइन प्रक्रिया (NVSP केंद्र किंवा BLO अधिकारी यांच्याकडे)

जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे शक्य नसेल तर, तुम्ही NVSP केंद्रामध्ये किंवा BLO (Booth Level Officer) यांच्याकडे जाऊन मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला…

  • तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रासह जवळच्या NVSP केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • फॉर्म 6B भरा आणि आधार कार्डची झेरॉक्स द्या.
  • त्यानंतर सदरच्या अधिकाऱ्यांमार्फत तुमचे मतदार ओळखपत्र आधार कार्डची लिंक केले जाईल.

SMS द्वारे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे

जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया खूपच किचकट वाटत असेल तर, तुम्ही SMS द्वारे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्ही SMS टाइप करा: <EPIC नंबर> <आधार क्रमांक>
  • हा SMS तुम्हाला 166 किंवा 51969 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
  • त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पुष्टीकरण मिळेल.

मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्यासाठी खाली क्लिक करा.

मतदार हेल्पलाइन ॲप द्वारे मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करणे

  • या पद्धतीने जर तुम्हाला मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करायचे असेल तर, सर्वप्रथम Voter Helpline App Google Play Store/Apple store वरून डाऊनलोड करा.
  • त्यानंतर या ॲप मध्ये लॉगिन करून “आधार फीड करा” हा पर्याय निवडा.
  • तुमचा EPIC क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो टाकून सबमिट करा.
हे वाचा 👉  Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score check; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?

वरील सर्व प्रक्रियांपैकी एका प्रक्रियेच्या आधारे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करू शकता.

फॉर्म 6B बद्दल थोडक्यात..

निवडणूक आयोगाने मतदारांना मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी फॉर्म 6B उपलब्ध करून दिला आहे. आता निवडणूक आयोगाने फॉर्म 6B मध्ये बदल केला आहे, त्यानुसार…

  • या आधी आधार क्रमांक देणे बंधनकारक होते, पण आता ते ऐच्छिक आहे.
  • जर कोणी आधार क्रमांक दिला नाही, तर त्याला याबाबतचे योग्य कारण नमूद करावे लागेल.

निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक राहावी यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पोस्टमध्ये आपण मतदार ओळखपत्र आधारशी लिंक कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page