व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Mera Ration 2.0 : आता अ‍ॅपवरूनच मिळणार तुम्हाला स्वस्त धान्य; कसे वापरावे अ‍ॅप पाहा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Mera Ration 2.0 – शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. डिजिटल पद्धतीने रेशन कार्डशिवाय नागरिकांना रेशन मिळणार आहे.

सरकारने रेशन मिळवण्यासाठी अ‍ॅप लाँच केले आहे. ‘मेरा राशन २.०’ हे अ‍ॅप वापरून आपण रेशन मिळवू शकणार आहे. म्हणजेच आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका अ‍ॅपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल. केंद्र सरकार दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते.

आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन २.० अ‍ॅपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे. भारत सरकारच्या या अ‍ॅपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरत राहतात. या अ‍ॅपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचे रेशन सहज मिळू शकेल.

तुमच्या गावची रेशन कार्ड यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेकवेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फे-या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता.

हे वाचा 👉  2kW सोलर सिस्टिम बसवण्यासाठी 60 हजार रुपये अनुदान मिळाल्यास, लाभार्थ्याला किती रुपये भरावे लागतील.. पहा संपूर्ण माहिती!

मेरा राशन अ‍ॅप २.० कसे वापरावे?
– गुगुल प्ले स्टोअर्स अ‍ॅप किंवा अ‍ॅपल स्टोअर्सवरून मेरा राशन २.० अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
– मेरा राशन २.० अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
– ओटीपी पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी भरा.
– या स्टेप्सनंतर तुमच्या रेशनकार्डची डिजिटल कॉपी ओपन होईल. ही प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.

तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?
नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट), रहिवासी प्रमाणपत्र (वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट), कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे लागतात.

मेरा रेशन ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page