नमस्कार मित्रांनो, सदर लेखांमध्ये आपण राज्यातील 20 लाख लाडक्या बहिणींना आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळणार आहे. याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कोणकोणत्या लाडक्या बहिणी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पंतप्रधान आवास योजना काय आहे?
1 जून 2015 रोजी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील गरीब लोकांना केंद्र सरकार मार्फत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. देशांमधील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा विस्तार करण्यात आला आहे त्यामध्ये गरीबापासून ते मध्यमवर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळण्यासाठी या योजनेतून निधी दिला जातो. सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेचे अनेक गट पाडण्यात आलेले आहेत. या गटानुसारच घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. सुरुवातीला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणारी कर्जाचे रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. आता या कर्जाची मर्यादा 18 लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर या कर्जावर अनुदानही मिळते.
तुमचे नाव घरकुल यादी मध्ये आहे का हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 13 लाख घरे मंजूर करण्यात आले आहेत. 2025 या एका वर्षात वीस लाखाहून अधिक घरांचा लाभ राज्यातील नागरिकांना घेता येणार आहे. सदर लाभामध्ये विशेषतः महिलांचा समावेश असणार आहे. यामुळे महाराष्ट्रात घरकुल योजनेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार पाहायला मिळणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी थोडक्यात..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत पाहायला गेले तर सदर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सक्षमीकरण हा आहे. सदर योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ सुरुवातीला देण्यात आला होता, परंतु महायुती सरकारने त्यांच्या निवडणूक अजेंड्यामध्ये जर महायुती सरकार निवडून आले तर ही रक्कम 2100 रुपये करणार असे सांगितले होते. त्यानुसार महायुती सरकार विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत विषय संपादन करून माहिती सरकार स्थापन झाले आहे. त्यानुसार माहिती सरकारचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर 2100 रुपये रकमेची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाईल असे सांगितले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पानंतर ही रक्कम महिलांना मिळू शकते.
त्याचबरोबर आता सरकारने लाडक्या बहिणींसाठी 13 लाखाहून अधिक घरे मंजूर केली असून महिलांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग या सरकारने मोकळा करून दिला आहे. यावरूनच असे दिसते की महिला सक्षमीकरणासाठी सरकार खूपच महत्त्वाचे निर्णय घेत आहे.
पंतप्रधान आवास योजना फायदे
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 13 लाख घरे मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेमध्ये केली आहे. महाराष्ट्र सरकारने योजनेचा लाभ लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावर होईल असे सांगितले आहे. यामागचा राज्य सरकारचा गरजूंना घरे मिळावी बरोबर राज्यातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही हा उद्देश आहे. सदर योजनेचे फायदे काय आहेत ते खालीलप्रमाणे:
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून तब्बल 13 लाख घरे मंजूर झाली असून, यासाठी लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
- केंद्र सरकारकडून 13 लाख घरे मंजूर झाले असून, 20 लाखापेक्षा अधिक घरे देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे.
- केंद्र सरकारने पुढील 5 वर्षात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही असा संकल्प करून सदर योजना युद्ध पातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
2.50 लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
पंतप्रधान आवास योजना आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान आवास योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर अर्जासोबत तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बीपीएल रेशन कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाण
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
पंतप्रधान आवाज योजनेचा अर्ज कुठे करायचा?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना संबंधित महसूल विभाग किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज करता येतो.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल
माहिती सरकारने महिलांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाला एक नवी दिशा मिळणार आहे. घरकुल योजनेतून महिलांना मिळणारी घरे ही त्यांची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती सुधारून त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सदर लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला सदर योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद!